भजनी मालिका
← भजनांकडे परत

शरण आलें त्यासी नेदावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना

sharan alen tyasi nedavin he pathi | aika jagajethi vidnyapana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शरण आलें त्यासी नेदावीं हे पाठी । ऐका जगजेठी विज्ञापना ॥१॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विज्ञापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥२॥ भागलियाचा होई रे विसांवा । परिसावी केशवा विज्ञापना ॥३॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विज्ञापना ॥४॥ तुका म्हणे आम्हां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विज्ञापना ॥५॥