भजनी मालिका
← भजनांकडे परत

शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम

shankhachakragadapadma | pail ala purushottam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥१॥ ना भी ना भी भक्तीराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी । धाकें दोष पळती सृष्टी ॥२॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरी आला ॥३॥