भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची

shaktanchi shukari may | vishtha khay bidichi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥ तिची त्या पडली सवे । मागें धांवें म्हणोनि ॥ध्रु.॥ शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥ तुका म्हणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥३॥