भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या

shakta gadhada jaye deshin | tethen rashi papachya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शाक्त गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥१॥ सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंद्रियें ॥ध्रु.॥ क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥२॥ मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥३॥ स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥४॥ तुका म्हणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥५॥