भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाहाणे सिंतरे व्याहाणे मोहरे

shahane sintare vyahane mohare

शाहाणे सिंतरे व्याहाणे मोहरे । भणंग धुरें आतुडे कैसें ॥१॥ या अवचित्या गोष्टी भाग्यें होय भेटी । प्रालब्ध सृष्टीं भोग देत ॥२॥ येत जात वाटा शरीरीं भरे फ़ांटा । मदमत्सरताठा भ्रमकुळीं ॥३॥ ज्ञानदेवो म्हणे या खुणे मी नेणें । पंढरिचे राणे उगविती ॥४॥