भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी

shahanapanen ved muka | gopika tya takati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥ यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥ तुका म्हणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥