भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें

sevatasi jari alen | tari jalen andhalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥ काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥ तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥