भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों

sevat to hoti tujhiyanen god | mhanauni chad dharitason

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥ तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥ तुका म्हणे आम्ही चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥