भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा

sevakasi adnya svamichi praman | jonvari ha pran jay tyacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥ तुका म्हणे तरी म्हणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥