भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन

set alen sugi sambhalave chari kon | pika alen pari kelen pahije jatan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥ सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धी व्हावीं दोनी ॥३॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्यांचे भाग देई त्यासी ॥४॥ तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥