भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान

sendarin hendarin daivaten | kon tin puji bhutenketen | apulya pota jin radaten | magati shiten avadan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥ दासीचा पाहुनरउखतें। धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तीहीन ॥२॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दनष । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥