भजनी मालिका
← भजनांकडे परत

सायुज्यसदनीं ज्ञानाचा उद्वार

sayujyasadanin dnyanacha udvar

सायुज्यसदनीं ज्ञानाचा उद्वार । विज्ञानें अमर पावताहे ॥१॥ साधनबाधन धन गोत वित्त । हरिविण वित्त मनीं नाहीं ॥२॥ मार्गींचा कापडी धरुनिया वोढी । ईश्वरीं उघडी उडी घाली ॥३॥ ज्ञानदेवा सिध्दी साधन सपूर । कलेवर कापूर मुरालासे ॥४॥