भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावित्रीची विटंबना । रांडपण करीतसे

savitrichi vitambana | randapan karitase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सावित्रीची विटंबना । रांडपण करीतसे ॥१॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥ कुबेर नांव मोळी वाहे। कैसी पाहें फजिती ॥२॥ तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मुखे का फुंदतां ॥३॥