भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे

savalen sundar rup manohar | raho nirantar hrudayin majhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥ तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥