भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावध जालों सावध जालों । हरीच्या आलों जागरणा

savadh jalon savadh jalon | harichya alon jagarana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सावध जालों सावध जालों । हरीच्या आलों जागरणा ॥१॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥ तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥