भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन

sattavartte man | pali viththalachi an

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥ आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥ सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥ आहे नाहीं त्याचें । तुका म्हणे कळे साचें॥३॥