भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्राविये कोठडि माजी निक्षेपिलें

satraviye kothadi maji nikshepilen

सत्राविये कोठडि माजी निक्षेपिलें । एकीं केलें धन ते बाविसें नेलें पातेजोनि ॥१॥ आपण नेणतां ऋण घ्यावयासी गेलों । तंव तंव सर्वस्वेसी बुडालों परोपरी देखा ॥२॥ मंत्र सांगितला माझ्या कानीं । जाणोनि ज्ञानविज्ञानीं वेडावलों ॥३॥ ऐसें रखुमादेविवरा विठ्ठलाच्या बोला । पातेजलों सर्वस्वासी ठेलों प्राड.मुख ॥४॥