भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण

sarvatmakapan | majhen hironi neto kon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥ मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥ घेईन जन्मांतरें। हें चि करावया खरें ॥२॥ तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥