भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वगत निर्धारितां आत्मा एक

sarvagat nirdharitan atma ek

सर्वगत निर्धारितां आत्मा एक चराचरीं तेथें तंव नाहीं दुजेयाची परी । चारी खाणी चारी वाणी चौर्‍यांयशीं लक्ष योनी मी अपत्य तुमचें अवधारी ॥ तुझिया भेटीलागी रोडेलों दातारा हे तनु होतसे संकीर्ण भारी । जवळीच असतां भेटि कां नेदिसी थोर सिणविलो वोरबारी रया ॥१॥ तुजविण मी कष्टलों दातारा कष्टोनि खेदक्षीण जालों । संसारश्रम त्रिविधतमें मार्ग सिध्दचि चुकलों ॥ उपजोनियां बुध्दी येऊं पाहे तुझे शुध्दी तंव द्वैतसंगें भांबवलों रय ॥ध्रु०॥ मागील कष्ट सांगतां दुर्घट नको नको ते आठवण । सुखदु:खें प्राण पिडला गा बापा गुणत्रयें ओझें जडपण । भव विभव निरय आपदा ऐसें ऐकिलें आनेआन । तूं हे जीव तरी भोगितां हे कवण हें आकळीतां वाटे विंदान रया ॥२॥ वेळोवेळ भावाभाव बोलतां अवचिता चोरटा काम उठी । तुज देखतां अनादि वाटपाडे वधापरि धैर्य धांवणे न करिसी गोष्ठी ॥ तुझियें दृष्टी शरीर काळ फाडफाडूं खातो कवण काकुलती तया ना तुज नुठी ऐसें विपरीत नवल वाटे ये सृष्टी रया ॥३॥ ऐसें न कळतां भरंवसा मी हिंडे दिशा हें तंव मन जालेंसें पिसें । असोयी जातां अपायी पडिजे श्वास उश्वास पाळती सरिसे ॥ वय वित्ताचा अंत घेउनि नाडळेपण परत्र पंथ नकळे भरवसें । कर्म वाटे आड गर्वे रिगतां तंव विघ्नचि उदैलें अपैसें रया ॥४॥ ऐसी माया मोहाची भुलवाणी घालुनि कीं बापा लाविलें अविचार कामा । उपाधि वळसा नथिला धिंवसा जड केला शुध्द आत्मा ॥ मी तूं कवणाचें विंदान न कळेचि ऐसी नित निगुति सीमा । तर्कबीज कैसें सांपडले वर्म मा हाचि भावो कल्पिला आम्हा रया ॥५॥ ऐसा वाउगाचि सोसु पुरला गा बापा परि तूं न पडसी ठाउका । साही दर्शनां अठारा पुराणां वेवादु नाहीं खुंटला ॥ आपुलाला स्वमार्गु संपादिता केउतां जासी गांवींचा गांवी । विश्वास नाहीं चित्ता ये देहीं ऐसियासी कीजे कायि रया ॥६॥ ऐसा जन्मोनि का उबगलासी मायबापा कवण कां सांडिली ऐसी । रंका काळाचेनि धाकें सत्कर्मे अनेकें विश्रांति नाहीं या जीवासी ॥ समर्थपणें वेगळें घातलें तरि दैन्य दारिद्र्य कां भोगवितासी । आपुलें म्हणतां न लाजसी देवा तरि सांगपां माव आहे ते कैसी रया ॥७॥ समुद्रीचें जळ घेऊनि मेघ वरुषती मेदिनी तें कां मागुतें मिळे सागरीं । आकाशा पासाव उत्पत्ति वायु हिंडे दशदिशीं । परि तें ठायींच्या ठायीं राहणें जालें । जळींहुनि तरंग अनेक उमटती परि ते जळींचे जळीं निमाले ॥ स्वप्नसंगें परदेशा गेले तरी जागृति ठायीं संचले रया ॥८॥ ऐसा तुज पासाव सगुण स्वरुप जन्मलो गा देवा आतां कैसोनि वेगळा निवडे । लवण पडिलें जळीं कीं कर्पूरासि नुरे काजळीं तैसे भावार्थ प्रेम चोखडें ॥ ज्ञानदेव म्हणे रुक्मिणीरमणा देई क्षेम वर्म न बोले फुडें । निवृत्तिप्रसादें खुंटला अनुवाद फिटलें सकळही सांकडें रया ॥९॥