भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी

sarva sukh godi sarva shastra nivadi

सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरिवीण ॥२॥ नाम मंत्र जप कोटी जाइल पाप । कृष्णनामी संकल्प धरुनि राहे ॥३॥ निजवृत्ति काढी सर्व माया तोडीं । इंद्रिया सवडी लपु नको ॥४॥ तीर्थव्रतीं भाव धरी ते करुणा । दया शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान । समधि संजीवन हरिपाठ ॥६॥