भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे

sarva bhutin dyaven anna | dravya patra vicharon | upatishthe karan | tethen bij perije

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥ भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥ म्हणोनि विवेकें । कांहीं करणें ते निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥