भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू

saravin ligaden dharava supanth | javen usantit haluhalu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥ वेचल्याचा पाहे वरावरी झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥ तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥