भजनी मालिका
← भजनांकडे परत

सार सप्तमीसि हारपली निशी

sar saptamisi harapali nishi

सार सप्तमीसि हारपली निशी । दशवे द्वारेसीं उभा राहे ॥१॥ तेथें तूं सावध अवघाचि गोविंद । देहीं देहाभेद करुं नको ॥२॥ इंद्रियांच्या वृत्ति दशवे द्वारीं गति । देहागेहउपरति होईल तुज ॥३॥ विस्तारी विस्तार गुण गुह्य सार । एकाएकीं पार सार साधी ॥४॥ विकृति विवर प्रकृति साचार । तत्त्वाचा निर्धार समरसीं ॥५॥ निवृत्ति सांगे ज्ञाना एक तूं करी । तरी तुतें कामारी होईल चित्तें ॥६॥