भजनी मालिका
← भजनांकडे परत

संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं

sanvasarasante ale ho aika | tutichen te naka kenen bharun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥ शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥ तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥