भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळीये निळी भुलली एकी नारी

sanvaliye nili bhulali eki nari

सांवळीये निळी भुलली एकी नारी ॥ परेचा वो घरीं शुध्दि पुसे ॥१॥ सांगेगे बाईये कोणे घरीं नांदे ॥ कैसें या गोविंदे हिंडविलें ॥२॥ चहूं मार्गी गेलें न संपडेची वाट ॥ मग चैतन्याचा घाट वेंधलीये ॥२॥ ज्ञानदेवी समाधि स्थान पैं विठ्ठल । अवघा चित्तीं सळ हारपला ॥३॥