भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची

sanvaliyachen tej sanvala shrihari | shej baj vovari brahmandachi

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि । शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥ गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी । मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥ ऐसा हा सांवळा सतेज साजणी । म्यां आपुल्या आंगणी देखीयला ॥२॥ ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचें । मी माझें मोहाचें हरिरुप ॥३॥