भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी

sanvalen rupaden choraten chittachen | ubhen pandhariche vitevari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी॥१॥ डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥ प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥४॥