भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळे सगुण उभे कर कटीं

sanvale sagun ubhe kar katin

रचनाकार: संत बंका · अभंग
सांवळे सगुण उभे कर कटीं । मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥ शंख चक्र करी ते कटावरी । पीतांबरधारी चतुर्भुज ॥२॥ लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले । श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥ वंका म्हणे धन्य देवांचा हा देव । वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥