भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळे परब्रह्म आवडे या जिवा

sanvale parabrahma avade ya jiva

सांवळे परब्रह्म आवडे या जिवा । मनें मन राणिवा घर केलें ॥१॥ काय करुं सये सांवळे गोंवित । आपेआप लपत मन तेथें ॥२॥ बापरखुमादेविवरु सांवळी प्रतिमा । मनें मनीं क्षमा एक जालें ॥३॥