भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांवळा सकुमार लावण्य त्रिभुवनीं

sanvala sakumar lavanya tribhuvanin

सांवळा सकुमार लावण्य त्रिभुवनीं । अवचितां आंगणीं देखिला रया ॥१॥ आळवितां नयेचि सचेतनीं अचेत । भावेंचि तृप्त माझा हरी ॥२॥ अज्ञानी न दिसे ज्ञानी येऊनि उभा । विज्ञानेसी शोभा दावी रया ॥३॥ ज्ञानदेवा सार सावळीये मूर्ति । निवृत्तीनें गुंति उगविली ॥४॥