भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांटविले वाण । पैस घातला दुकान

santavile van | pais ghatala dukan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥ निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥