भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें

santanchya paduka ghein moche khandin | hatin tal dindi nachen pudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥ध्रु.॥ ध्यानगति मति आसन समाधि । हरीनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥ नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊ गीतीं ॥३॥ सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥४॥