भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश

santanchiye ganvin premacha sukal | nahin talamal duhkhalesh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥ संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥ संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साठी घेती देती ॥४॥ तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालों त्यांचा ॥५॥