भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची

santanchen sukh jhalen ya deva | mhanauni seva kari tyanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥ तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥ तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥