भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा

santanche gun dosh anitan ya mana | keliya ugana sukrutacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥ तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥