भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों। मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों

sansarapasuni kaisen sodavishi | na kale hrushikeshi kay jalo |karitan na sare adhik vat pahin | trushna deshadhadi kelon | bhaktibhajanabhav yansi nahin thav | charanin tujhya antaralon| magen pudhen rig na pure chi pahatan | avagha avaghin veshtilon

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों। मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥ इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय । क्षण एक स्थिर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥२॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥