भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारकथा प्रपंच चळथा

sansarakatha prapanch chalatha

संसारकथा प्रपंच चळथा । मनाचा उलथा विरुळा जाणे ॥१॥ होतें तें पाहीं नव्हे तें घेई । द्वैतबुध्दि ठायीं गुंफ़ों नको ॥२॥ चित्तवृत्ति ध्यानीं मनाची निशाणी । भ्रमभेद कानीं ऐकों नको ॥३॥ ज्ञानदेव गंगा नि:संगाच्या संगा । वेगीं श्रीरंगा शरण जाई ॥४॥