भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें

sansarachya bhenen | palon na lahesen kelen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥ जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥ गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें तें कैसें ॥३॥ स्वप्नाचीये परी । जागा राहे तंव घरीं ॥४॥ तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥