भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां

sansarachen nahin bhay | amhan karil to kay | ratrandivas pay | jhalon nirbhay athavitan

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥ आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥ कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी । आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥ आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी । चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥