भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी

sansarachen dhanve vethi | avadi potin kevadhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥ हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥ लाज तेवढी नारायणीं । वांकडी वाणी पोरांपें ॥२॥ तुका म्हणे बेशरमा । वरी श्रमा पडिभरू ॥३॥