भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरीजन

sansar to kon dekhe | amhan sakhe harijan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरीजन ॥१॥ काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥ स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥ तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥