भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान

sangon janati shakun | bhut bhavishya vartaman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥ त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥ रिद्धीसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥ तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥