भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग

sangaven ten baren asaten hen potin | duhkh dete khoti buddhi mag

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥ तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥