भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां

sangaton tumhisi bhaja re viththala | nahin tari gela janma vanyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥ कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥