भजनी मालिका
← भजनांकडे परत

संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें

sangatinen hoto pangaticha labh | ashobhin anubhav asijeten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥ तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ती । पुरवावी आर्ती निर्बळांची ॥३॥