भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें

sanduniyan sarva laukikachi laj | alava yaduraj bhaktibhaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥१॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥ वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥