भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा

sanduni sukhacha vanta | mukti mage to karanta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥ कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥ येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥२॥ तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांची संगे॥३॥