भजनी मालिका
← भजनांकडे परत

संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें

sandhya karitosi keshavachya nanven | arambhin ten thaven nahin kaisen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥ तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥