भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं

sandavale sakalanche abhiman | anile sharan lotanganin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥ भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥ एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥ आजिवरी आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥ तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥ राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥ सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥ त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥