भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता

samarthasi laj apulya namachi | sharan alyachi lage chinta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥ मान भलेपण नाहीं फुकासाठी । जयावरी गांठी झीज साहे ॥२॥ तुका म्हणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥